अकलूजमध्ये सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात
अकलूज, ता. १० : ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.
व्रतबंध अथवा उपनयन संस्कार हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा संस्कार मानला जातो. समाजातील गरजू कुटुंबांना हा संस्कार अल्पखर्चात करता यावा, या उद्देशाने सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ११ भटुंनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, धनंजय देशमुख व अभय इनामदार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.