Toilet-Issue 
पुणे

पुण्यात महिलांच्या स्वच्छतागृहात मिळतोय वडापाव

ज्ञानेश सावंत

पुणे - महापालिकेने महिलांसाठी जुन्या बसगाड्यांत ‘ती’ स्वच्छतागृहे सुरू केली. मात्र, आता याच बसमध्ये स्वच्छतागृहाशेजारी खाद्यपदार्थांचा स्टॉल सुरू करून महिलांची अधिकच अडचण केली आहे. ‘कमर्शिअल ॲक्‍टिव्हिटी’ म्हणून दहा स्वच्छतागृहांच्या बसमध्ये स्टॉल थाटण्यास महापालिकेने ठेकेदाराला परवानगी दिली. हे स्टॉल उभारून ठेकेदाराने ते भाडेतत्त्वावर देण्याची योजना आखली आहे.

शहरात स्मार्ट सिटीसह नवनव्या प्रकल्पांची उभारणी करताना महिलांच्या स्वच्छतागृहांची समस्या नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठांत स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. तेव्हा, किमान ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणी महिला आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांनी महापालिका आणि संबंधित यंत्रणांकडे केली आहे. मात्र, जागा उपलब्धतेचे फुटकळ कारण देत यंत्रणांनी कार्यवाही केली नाही.

पुणे :..अन् फर्ग्युसन रस्त्याने घेतला मोकळा श्वास

महिलांच्या स्वच्छतागृहांना प्राधान्य आहे. त्यामुळे जेथे ‘ती’ टायलेटची सोय आहे, तिथे अन्य कोणत्या प्रकारचा स्टॉल असू नये. जिथे कुठे ते सुरू केले आहेत ते बंद करण्याचा सूचना करू.
- सरस्वती शेंडगे, उपमहापौर, महापालिका

खर्च वाढल्याचे कारण
आधी संपूर्ण बसमध्ये स्वच्छतागृहाची रचना होती. महिलांना आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून स्वच्छतागृहांची देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे आहे. मात्र, देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत ठेकेदाराने बसच्या काही भागांत ‘कमर्शिअल ॲक्‍टिव्हिटी’साठी परवानगी देण्याची मागणी केली. मंजुरी मिळताच ठेकेदाराने खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले. ते पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT