पुणे

नितीन श्रीपत कराळे

CD

टोकेवाडी

इन्फो
...
टोकेवाडी ही आगडगावची एक वाडी. मुख्य गावापासून पश्चिमेला असलेली शेती काहीशी दूर होती. चार-पाच किलोमीटरवर रोज जाणे शक्य होत नसे. म्हणून पाच पिढ्यांपूर्वी त्या भागातील कुटुंबांनी वस्त्या केल्या. टेकाड भागात असल्याने टोकेवाडी असे नाव पडले. वाडीची लोकसंख्या सुमारे ३५० आहे.
- नितीन श्रीपत कराळे, विश्वस्त, श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट.
...
गावातील कराळे पाटील घराण्यातील काही कुटुंब प्रारंभी टोकेवाडीत वस्त्या करून राहू लागले. नंतरच्या काळात इतरही शेतकरी आले. कराळे, घोगरे, बोरुडे, महापुरे आदी आडनावाचे कुटुंब या वाडीत आहेत. याच भागातील हाडुळा परिसरात भिंगारदिवे, शिरसाठ आदी कुटुंबे आहेत.
वाडीत मारुतीचे सुंदर मंदिर आहे. वेस, तालीम, ग्रामपंचायत कार्यालय आहे. जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंत आहे. टोकेवाडीचे आकर्षण म्हणजे गावात पुरातन आड आहे. आजही त्याचे पाणी वापरले जाते. दुष्काळात त्यामध्ये पाणी असते. बारादरी येथून आणलेल्या पाणी योजनेचे पाणी त्यामध्ये सोडले जाते. राजकीयदृष्ट्या वाडीवरील कार्यकर्ते सजग असतात. आगडगाव ग्रामपंचायती अंतर्गत तीन नंबरचा प्रभाग येथे आहे. त्यामुळे तीन सदस्य या प्रभागातून निवडले जातात. सेवा संस्था, देवस्थान, तसेच सर्व उपक्रमांत वाडीचा मोलाचा वाटा असतो. वाडीच्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला, तरी पूरक व्यवसाय म्हणून बहुतेक कुटुंब दुग्धव्यवसाय करतात. भाजीपाला पिकवितात. हुलगे, करडई, मटकी आदी कडधान्याबरोबरच घेवडा, बाजरी, ज्वारी, गहू आदी पिके चांगली येतात.
वाडीतील मुले चांगली शिकली. अधिकारी झाले. काही युवक उत्तम शेती करतात. काहीजण नगरला व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. कराळे कुटुंबीयांचा गावात पूर्वी वाडा होता. मागील पिढीतील किसनराव कराळे यांनी आगडगावमधील जमीन विठ्ठल मंदिराला दान केली. ग्रामपंचायत सदस्या आशा कराळे यांनी हागणदारीमुक्त गाव योजनेंतर्गत शंभर टक्के शौचालये बांधकाम करून घेतल्याने त्यांचा तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बल्गन यांच्या हस्ते गौरव झाला होता.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT