Toll movement to pick up speed again Role of Action Committee 
पुणे

टोलनाका आंदोलन घेणार पुन्हा वेग; कृती समितीची भुमिका

सकाळवृत्तसेवा

नसरापूर : टोलनाका हटवण्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी निर्णायक व अक्रमक भुमिका घेणे गरजेचे असुन टोलनाका हटाव अंदोलन पुन्हा वेगाने सुरु करणार असल्याचा निर्णय आज झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

1 जानेवारी 2021 पासुन खेड शिवापुर टोलनाक्यावर सर्वच वाहनांना फास्टटँग बंधनकारक करणार येणार असल्याच्या पार्श्वभुमीवर टोलहटाव कृती समितीची बैठक आज केळवडे येथे पार पडली या बैठकीस समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, डॉ संजय जगताप, रोहन बाठे, शहाजी अरसुळ, दादा पवार, शुभम यादव यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये टोलनाका हटवणे हिच कृती समितीची प्रमुख मागणी असुन त्या मागणीसाठी केंद्रीय पातळीवर रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत बैठक होणार होती. मात्र कोरोनाच्या कार्यकाळात ही बैठक होऊ शकली नाही त्या बैठकीच्या आम्ही प्रतिक्षेत आहोत यासाठी लोकप्रतिनीधींनी निर्णायक व अक्रमक भुमिका घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले

निमंत्रक दारवटकर यांनी माहीती देताना सांगितले कि,मागील अंदोलनाच्या वेळी केंद्रीय पातळीवर प्रश्न सोडवण्यात येणार असल्याने स्थानिक पातळीवर महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासन यांनी पत्र देऊन एम एच 12 व 14 वाहनांना टोल माफी लेखी जाहीर केली आहे आता स्थानीकांनाही फास्टटँग बंधनकारक करणार ही भुमिका टोल प्रशासनाने जाहीर केल्या नंतर टोलनाका हटाव कृती समितीने जिल्हाधिकारी पुणे यांची भेट घेवुन महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासन स्थानिक नागरीकांची फसवणुक करत असल्याचे निदर्शनास आणले आहे यावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मध्ये या विषयावर लोकप्रतिनीधीं बरोबर चर्चा करण्यात येईल असे सांगितले आहे या बाबत योग्य निर्णय न झाल्यास एक तारखेला कृती समिती वेगळ्या पध्दतीने अंदोलन करेल, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मागील अंदोलनात झालेला निर्णय प्रशासनाला कायम स्वरुपात ठेवावा लागेल असे दारवटकर यांनी यावेळी जाहीर केले आहे.

टोल हटल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही-
खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील अंदोलनाच्या वेळी टोल हटवण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होणार असुन याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर बैठक घेण्याचे मान्य केले होते मात्र अद्याप तशी बैठक होऊ शकली नाही खा. सुळे यांनी या बाबत गांभीर्याने निर्णय घेऊन गडकरी यांच्या समवेत बैठकीचे अयोजन करावे अशी मागणी यावेळी बैठकीत कृती समितीच्या सर्व सदस्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT