Toll naka staff beat ST driver incident at khed shivapur pune crime news sakal
पुणे

Pune Crime : टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची STचालकाला मारहाण; खेड शिवापूरमधील गंभीर प्रकार

खेड शिवापूर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर गुरुवारी (ता. १९) सायंकाळी एसटीचालकास १० ते १५ टोल कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : खेड शिवापूर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर गुरुवारी (ता. १९) सायंकाळी एसटीचालकास १० ते १५ टोल कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. याबाबत एसटीचालक प्रवीण भगवान नांगरे (वय ३४, रा. गुहागर, जि. रत्नागिरी; मूळगाव आटपाडी, जि. सांगली) यांनी तक्रार दाखल केली.

त्यानुसार, ते गुरुवारी (ता. १९) एसटी बस (क्र. एमएच २० बीएल १२४८) चालवत गुहागरवरून स्वारगेटला येत होते. त्या वेळी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या बसला शिवापूर टोलनाक्यावर एका ट्रकचालकाने कट मारला व तो ट्रक टोलनाका पार करून पुढे वजनकाट्यावर थांबला.

त्या वेळी नांगरे यांनी एसटी बाजूला लावून ट्रकचालकास, ‘तू एसटीला कट का मारला?’ अशी विचारणा केली. त्या वेळी तेथे टोलनाक्यावर काम करणारा कर्मचारी विशाल जाधव याने, ‘तू तरी कुठे एसटी नीट चालवतो.

एसटी ड्रायवरांना लय माज असतो,’ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण सुरू केली. हे पाहून टोलवरील इतर कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन, त्यांनीदेखील मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणारे साधारण दहा ते पंधरा जण होते. त्यामध्ये चालक नांगरे जबर जखमी झाले. तसेच, सोडवण्यासाठी आलेल्या एसटीच्या वाहकालादेखील मारहाण केली.

या दरम्यान एसटीमधील प्रवाशांनी व इतरांनी फोनवरून जवळच्या पोलिस चौकीला माहिती दिली. मात्र, घटना घडून दोन तास झाले तरी पोलिस टोलनाक्यावर फिरकले नाहीत. उलट, ‘तुम्हीच एसटी घेऊन शिवापूर चौकीला या,’ असे सांगण्यात आले. त्यामुळे ते शिवापूर पोलिस चौकीला गेले.

दरम्यान, टोलनाक्यावरील गुंडांना येथील पोलिस पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मी आमच्या एसटी कामगार युनियनकडे दाद मागणार आहे, असे एसटी चालक प्रवीण भगवान नांगरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT