Toll will increased by 2 5 percent from April 1 at Khed Shivapur toll booth pune Sakal
पुणे

Toll Plaza : खेड शिवापुर टोलनाक्यावर 1 एप्रिल पासुन टोल अडीच टक्क्यांनी वाढणार

पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी टोल वसुली वाढणार असुन या बाबत ठेकदार टोल रोड प्रशासना मार्फत पत्रक प्रसिध्द करण्यात आले असल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे.

किरण भदे, नसरापूर

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी टोल वसुली वाढणार असुन या बाबत ठेकदार टोल रोड प्रशासना मार्फत पत्रक प्रसिध्द करण्यात आले असल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे.

टोल रोड प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या करारा नुसार दरवर्षी टोल चे दर वाढत असतात यावर्षी 1 एप्रिल 2024 पासुन सुमारे अडीच टक्के टोल वाढ होणार असल्याची माहीती टोल रोडचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटीया यांनी दिली असुन प्रवाशांनी या टोल वाढीसाठी सहकार्य करण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

या वाढणारया टोल वसुली मध्ये कार जीप व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार असुन मागील वर्षी घेण्यात येणार 115 रुपये दर आता 120 होणार आहे,हलक्या व्यवसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत,

बस ट्रक साठी दहा रुपयांची वाढ होणार असुन आता 400 रुपये दर द्यावा लागणार आहे तर जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये होणार आहे या बरोबरच अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होणार असुन अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

स्थानिकांच्या मासिक पास मध्ये देखिल 1 एप्रिल पासुन दहा रुपयांची वाढ होणार असुन आता मासिक पास 340 रुपये होणार आहे सर्वच स्थानिक वाहन चालकां कडुन टोल वसुली साठी वरीष्ठ व्यवस्थापन प्रयत्नशिल असुन स्थानिकांनी 340 रुपयांचा मासिक पास घेऊन सहकार्य करावे अशी आम्ही विनंती करणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT