tomato  esakal
पुणे

Tomato : शेतकऱ्यांच्या घामाचा होतोय ‘लाल चिखल’; टोमॅटो फेकून देण्याची आली वेळ

गेल्या वर्षी प्रतिकिलोला ८० ते १०० रुपयांवर गेलेला बाजारभाव आता आता पाच ते आठ रुपयांवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चाकण - जिल्ह्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात टोमॅटोला प्रतिकिलोला पाच ते आठ रुपये बाजारभाव मिळत आहे. आवक वाढली असून मागणी कमी असल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरत झाली आहे.

गेल्या वर्षी प्रतिकिलोला ८० ते १०० रुपयांवर गेलेला बाजारभाव आता आता पाच ते आठ रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची तसेच विक्रीअभावी फेकून देण्याची वेळ आली आहे.

महात्मा फुले बाजारात टोमॅटो स्थानिक परिसरातून तसेच नगर, नाशिक, लातूर जिल्ह्यातून विक्रीसाठी येत आहे. सुमारे तीस टनावर टोमॅटोची मोठी आवक होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना शेतीपिकाला कसेबसे पाणी देऊन शेतकरी शेतीमाल पिकवतो आहे. त्यात बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यात उत्पादन खर्चही अधिक असतो.

यासाठी होतो अधिक खर्च...

  • मशागत

  • शेणखत

  • रासायनिक खते टाकणे

  • बेड वाफे तयार करणे

  • मल्चिंग पेपर

  • औषधांची फवारणी

  • रोपांची दोरीने बांधणी

  • उन्हापासून संरक्षणासाठी कापडी आच्छादन

टोमॅटो पिकाला एकरी साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च येतो. टोमॅटो तोडणीसाठीच्या मजुरीचा खर्चही दिवसेंदिवस वाढतो आहे. यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतीमालास सरकारने हमी भाव द्यायला हवा.

- मुचकुंद जाधव, शेतकरी, भोसे (ता. खेड)

चाकणला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होते आहे. परंतु बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. टोमॅटो हे पीक शेतकऱ्यांना कधी मालामाल तर कधी उद्‍ध्वस्त करणारे बेभरवशाचे पीक झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळणे गरजेचे आहे. सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- कैलास लिंभोरे, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

टोमॅटोचे बाजारभाव ऐन उन्हाळ्यात घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सरकारचे ही याकडे लक्ष नाही.

- विक्रम शिंदे, शेतकरी चाकण (ता. खेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT