Corona Vaccination esakal
पुणे

पुणे : कोव्हॅक्सिनचे साडे सहा हजार डोस उपलब्ध

या तारखेपुर्वी पहिला डोस घेतलेल्यांना उद्या दुसरा डोस मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात उद्या (मंगळवारी) सात ठिकाणी कोव्हॅक्सिन (covaxine) लस उपलब्ध असून, सहा केंद्रांवर प्रत्येकी १ हजार तर एका केंद्रावर ५०० डोस उपलब्ध आहेत. तर कोव्हिशील्ड (covishield) लस संपल्याने या लसीचे केंद्र बंद असणार आहेत. (tommarrow pune covaxine six thousand doses available)

महापालिकेकडे सुमारे १३ हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते. पण प्रत्येक केंद्रावर ३०० डोस दिले जात होते. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी लस वाटपाचे धोरण बदलले असून, महापालिकेकडे असलेली लस साठवून न ठेवता ती वाटप करून टाकावी असे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोव्हॅक्सिन लस मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाली आहे. सोमवारी ६ हजार ५०० डोस उपलब्ध झाले होते. आता मंगळवारी देखील तेवढीच लस दिली जाणार आहे. नागरिकांकडून कोव्हॅक्सिन लसीला मागणी असली महापालिकेतर्फे उपलब्ध होत नसल्याने खासगी दवाखान्यात जावे लागत होते.

मंगळवारी राजीव गांधी रुग्णालय, जयाबाई सुतार दवाखाना, बिंदू माधव ठाकरे दवाखाना, दशरथ भानगिरे दवाखाना, कमला नेहरू दवाखाना ससून रुग्णालय येथे प्रत्येकी १ हजार डोस उपलब्ध आहेत. तर मालती काची रुग्णालयात ५०० डोस उपलब्ध असणार आहेत. १३ जुलै पूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना उद्या दुसरा डोस मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT