पुणे - पुणेकरांच्या कुटुंबातील प्रत्येकाची सकाळ ताजी-टवटवीत बनविणारा, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आणि त्यांना मायेचा आधारही देणारा, आबालवृद्धांचा सोबती, आपल्या सर्वांचा ‘सकाळ’ उद्या (ता. १) ८९व्या वर्षात पदार्पण करणार आहे, तोही आपल्या सर्वांच्या विशेष उपस्थितीनेच.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाची बातमी घेऊनच नव्या वर्षाची सकाळ उगवते. म्हणूनच, नववर्षाबरोबर वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘सकाळ’च्या कार्यालयात पुणेकरांचा स्नेहमेळावा रंगतो. याच सोहळ्यात एकमेकांना शुभेच्छा देत आपल्यातील नाते अधिक घट्ट होते.
असाच स्नेहमेळावा यंदाही ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. ‘सकाळ’ आणि वाचक यांच्यात गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे. तो आणखी दृढ करण्यासाठी या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘सकाळ’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.