स्वच्छता अभियान SAKAL
पुणे

जिल्हयात उद्या स्वच्छता महाश्रमदान दिनाचे आयोजन

या दिवशी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत गावा-गावातील परिसर स्वच्छ केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेने जिल्ह्यात येत्या गुरुवारी (ता.१६) स्वच्छता महाश्रमदान दिन आयोजित केला आहे. या दिवशी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत गावा-गावातील परिसर स्वच्छ केला जाणार आहे.

या दिवशी सर्व गावांमध्ये एकाचवेळी सामुदायिक श्रमदान, शोषखड्डा निर्मिती, भिंतींवर स्वच्छताविषयक घोषवाक्य लिहिणे, सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहिणे, शाळा-अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे, सार्वजनिक शौचालयांचे रंगकाम करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करणे आणि प्लॅस्टिक बंदी विषयक कार्यवाही करणे आदी स्वच्छताविषयक कामे केली जाणार आहेत.

सामुदायिक श्रमदानात गावातील सर्वच ठिकाणांची साफसफाई करणे, झाडलोट करणे, कचरा संकलन व वर्गीकरण करणे, कचरा उचित व्यवस्थापन करणे, पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता केली जाणार आहे. या महाश्रमदान दिनात रकारी यंत्रणेतील सर्व जिल्हा, तालुका व गावपातळीवरील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुण, महिला मंडळे, बचतगट व गणेश मंडळे आदींचा सहभाग असणार आहे.

दरम्यान, या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (ता. १३) सर्व सरपंच, ग्रामसेवक यांची आॅनलाइन बैठक घेतली. या उपक्रमाची माहिती आपापल्या गावातील सर्व ग्रामस्थांना माहितीपत्रक, दवंडी आणि लाऊडस्पीकरवरून देण्याच्या सूचना प्रसाद यांनी यावेळी सर्व ग्रामसेवकांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT