farmer 
पुणे

उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्र्यांचे फोन उद्या दिवसभर खणाणणार  

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा कांदा प्रति किलो वीस रुपये या दराने खरेदी करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या (ता. २८) फोन आंदोलन पुकारले आहे. या अंतर्गत राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत केंद्र व राज्य शासनातील कृषिमंत्री, खासदार, आमदार व मुख्यमंत्री यांना फोन करणार आहेत. 

याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे व तालुकाध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी माहिती दिली की, भाव नसल्याने चाळीत साठवण केलेला कांदा खराब होऊ लागला आहे. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने राज्यातील उत्पादक अडचणीत सापडले आहेत. लाॅकडाउन व राज्यातील बाजार समित्या कधी बंद, तर कधी सुरू असतात. त्यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादकांना आपला कांदा वेळच्या वेळी विक्री करता आला नाही. कांदा चाळींमध्येच सडण्यास सुरुवात झाली आहे.

कांद्याच्या दरात मागील वर्षी वाढ झाल्यानंतर सरकारने तत्काळ कांदा निर्यात बंदी केली व कांदा आयात करून कांद्याचे बाजार भाव कमी करण्यासाठी पावले उचलली. परंतु, आज शेतकर्‍यांचा कांदा मातीमोल दराने विक्री होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, यासाठी या पूर्वी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ट्विटर आंदोलन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्र लिहिण्याचे आंदोलन केले. मात्र, प्रश्न सुटला नाही. 

राज्यकर्त्यांचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी फोन आंदोलनाद्वारे उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत केंद्रीय कृषिमंत्री मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व इतर मंत्री, खासदार, आमदार यांना फोन करून कांद्याच्या थेट खरेदीच्या मागणीसाठी विनंती करतील. नेत्यांचे मोबाईल नंबर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या फेसबुक ग्रुप व व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT