The topic of the discussion took place of patils appearance
The topic of the discussion took place of patils appearance 
पुणे

भिसे यांच्या व्यासपीठावर पाटीलांची उपस्थिती झाला चर्चेचा विषय

सचिन लोंढे

कळस - इंदापूर तालुक्यातील बाबीर यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्षांनी आयोजित केलेल्या गजढोल स्पर्धेला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनपेक्षितपणे लावलेली हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. गेल्या काही वर्षांपासून यात्रेनिमित्त पाटील हे देवदर्शनासाठी येत असतात. मात्र ते गजढोल स्पर्धेकडे फिरकत नाहीत. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर स्पर्धेच्या या व्यासपीठावर उपस्थिती लावल्यानंतर अनेकजण अचंबित झाले. भिसेंचे आदरातिथ्य स्वागत स्विकारल्यानंतर पाटील यांनी त्यांच्यावर जाहीर स्तुतीसुमने उधळली. शिवाय या स्पर्धेसाठी पंधरा हजारांचे रोख बक्षीसही दिले. भिसें यांच्या व्यासपिठावरील पाटील यांची उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.   

कधीकाळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शिलेदार म्हणून परिचित असलेले अमोल भिसे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना गटनेते पदही भूषविले होते. परंतू काही कारणास्तव वेगळी वाट धरुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1995 पासून माजी सहकारमंत्री पाटील यांचे प्रामाणिक काम करत त्यांना विजयाच्या शिखरावर पोचविण्यात भिसे यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या एक तपाच्या काळापासून ते माजी मंत्री पाटील यांच्यापासून दुरावले आहेत. परंतू दरम्यान राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम करत तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. शिवाय तालुक्यातील सत्ता पालटामध्येही त्यांचे योगदान आहे. 

राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत, लोप पावत चालेली गजढोल लोककला जपण्याचे काम यात्रेनिमित्त करत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून बाबीर यात्रेमध्ये गजढोल स्पर्धांचे आयोजन करुन, विजेत्या संघांना सन्मानित करण्यात येते. सुरवातीच्या काळात पाटील यांच्यासोबत असताना आवर्जुन उपस्थिती लावणारे पाटील यांच्या उपस्थितीत राजकीय दुरावा निर्माण झाल्याने खंड पडला होता. 

सध्या विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री पाटील यांच्यात आगामी विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच भिसे यांच्या कार्यक्रमात पाटील यांची उपस्थिती तालुक्यात चर्चेचा विषय झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT