torna fore mengai devi temple sakal
पुणे

Torana Fort : स्वातंत्र्यानंतर प्रथमच किल्ले तोरणा गडावरील देवीचे मंदिर व परिसर विजेच्या प्रकाशाने उजळला

आकर्षक विद्युत रोषणाईने ऐन नवरात्र उत्सवात मंदिर व गडाचा परिसर उजळून निघाला आहे.

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - गेल्या दोन वर्षांपूर्वी गडावरील हनुमान बुर्जापर्यंत पोहोचलेली विद्युत सेवा ही अखेर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गडावरील मेंगाई देवीच्या मंदिर व परिसरात पोहोचल्याने शिवभक्त सह नागरिक व भाविकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे समन्वयक व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे यांच्या कार्य तत्परतेमुळे व प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गडावरील शिवकालीन श्री मेंगाईदेवी मंदिरात विद्युतीकरण करण्यात आले आहे.

आकर्षक विद्युत रोषणाईने ऐन नवरात्र उत्सवात मंदिर व गडाचा परिसर उजळून निघाला आहे. नवरात्र उत्सवात गडावर विजेचा लखलखाट झाल्याने पर्यटकांसह भाविकांची गैरसोय दूर झाली आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून गडावरील श्री मेंगाई मंदिरासह सर्व ऐतिहासिक वास्तू, स्थळे अंधारातच होती. दोन वर्षांपूर्वी किल्ले तोरणा गडावरील हनुमान बुरुजा पर्यंत विद्युतीकरण झाले होते. परंतु प्रत्यक्षात येथील ऐतिहासिक मंदिरांमध्ये लाईट पोहोचली नव्हती.

या तरी वर्षी नवरात्र उत्सवामध्ये या मंदिरांमध्ये लाईट पोचण्यासाठी वेल्हे येथील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साकडे घातले. त्याची दखल घेत जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता टी. राठोड आदींनी एस. टी. राठोड आदींनी वीजपुरवठ्यासाठी लक्ष घातले.

उपविभागीय अभियंता नवनाथ घाटुळे यांनी बुरुजापासून मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतराची केबल उपलब्ध केली. वेल्हे येथील शाखा अभियंता विनोद थाटे, संतोष शिंदे, कर्मचारी गणेश शिंदे, अमोल डांगे, संदीप दर्डींगे, पुरातत्व खात्याचे पाहरेकरी दादू वेगरे आदींनी परिश्रम घेत मंदिरात वीजपुरवठा सुरू केला.

तोरणागडावर वीजपुरवठा व्हावा, यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, माजी उपसरपंच सुनील राजिवडे, प्रदीप मरळ, मंगेश कोडातकर, हे प्रयत्नशील होते. याबाबत गडाच्या बुरुजापासून श्री मेंगाई मंदिरांसह व ऐतिहासिक वास्तू, प्रवेश- द्वाराच्या परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी कार्यवाही असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT