Torna Fort three Shivaji maharaj era caves tourism travel pune
Torna Fort three Shivaji maharaj era caves tourism travel pune  sakal
पुणे

Torna Fort : किल्ले तोरणा गडाच्या तटबंदीखाली तीन शिवकालीन गुहा उजेडात

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गाकडुन बुधला माचीकडे आडबाजूला तीन शिवकालीन गुहा उजेडात आल्याने गडदुर्ग प्रेमींसाठी हा कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय निर्माण झाला असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा गडाची उंची व विस्तार पाहता यास प्रचंड गड म्हणून संबोधले जाते. छत्रपतींच्या कार्यकालामध्ये किल्ले तोरणा व राजगड यांना अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक, दुर्ग अभ्यासक,ट्रेकर्स,शिवप्रेमी, किल्ल्यांना भेटी देत असतात.

या किल्ल्यांवरती तोफेचे गोळे , शिवकालीन नाणी सापडणे किंवा गुप्त भुयारी मार्ग हे अनेक वेळा सापडले आहेत. दरम्यान या गडाच्या मेटपिलावरे मार्गावरील श्री कुंबळजाई मंदिर मार्गे अडगळीच्या झाडाझुडुपांतुन पढेर दांडावर जात असताना स्थानिक नागरिकांना या गुहा दिसल्या.

त्यांनी गुहेच्या तोंडाशी असलेल्या झुडपे, माती काढून पहिले असता आत प्रशस्त आकाराची गुहा आढळली असल्याची माहिती माजी सरपंच हनुमंत पिलावरे यांनी दिली. यातील एका गुहेत बसण्यासाठी दगडी आसनं व्यवस्था मध्यभागी चौक आहे. तर इतर दोन गुहेमध्ये जाताना गुडघ्यावर वाकत जावे लागत गुहेचे आतील अंतराचा अंदाज येत नसून आत मध्ये गेल्यास जीव गुदमरला जात असुन यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी अति उत्साहात आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पुरातत्व विभागाचे कर्मचारी दादू वेगरे यांनी केले आहे.

पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे म्हणाले,

तोरणागडाचा विकास आराखड्यात किल्ल्यावर अनेक प्रकारची कामे चालू असून सापडलेल्या गुहा ह्या मुख्य मार्गावर नसून अडगळीच्या मार्गावर वनविभागाच्या हद्दीत आहे या गुहांची लवकरच पाहणी करणार आहे. या गुहा शिवकालीन असुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडाच्या सुरक्षेसाठी गुहात चौक्या पाहऱ्यांच्या जागा तयार केल्या असाव्यात असे स्थानिक अभ्यासकांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT