पुणे

भोवऱ्यासारखे फिरणारे ढग कधी पाहिलेत का? पाहा भन्नाट व्हिडिओ

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : रविवारी (ता. 26) दुपारी तीनच्या सुमारास आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले होते.  त्यावेळी पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे निसर्गाचा दुर्मिळ असा चमत्कार दिसून आला. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आकाशामध्ये भोवऱ्यासारखे चक्राकार गतीने ढग फिरताना दिसून आले. या बाबत जलतज्ज्ञ महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परदेशातील टोरनॅडो प्रकारातील चक्रीवादळाचा हा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच, भारतामध्ये ही घटना दुर्मिळ असल्याचेही ते म्हटले.

पिसर्वे (ता. पुरंदर) येथे रविवारी दुपारी आकाशात काळ्याकुट्ट ढगांमधून चक्रीवादळाप्रमाणे चक्राकार फिरणाऱ्या ढगांची शेपटी दिसून आली. कुतूहल म्हणून येथील 'सकाळ'चे वाचक व मुक्त पत्रकार संदीप बनसोडे यांनी त्यांच्या घराच्या छतावरून या वादळाचा व्हिडिओ घेतला. त्यावेळी त्या वादळाची शेपटी मोठी होताना दिसली. त्यानंतर त्या शेपटीच्या भोवती आजूबाजूचे ढग गोलाकार फिरताना साध्या डोळ्यांनीदेखील पाहता आले. हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर 'सकाळ' प्रतिनिधींच्या माध्यमातून जलतज्ज्ञ महेश गायकवाड यांच्याकडे पाठविला. 

त्या व्हिडिओची पाहाणी केल्यानंतर. गायकवाड म्हणाले, "हे टोरनॅडो प्रकारातील वादळ आहे. ज्या ठिकाणी ढगांची घनता जास्त असते, तेथे त्याची निर्मिती होते. तसेच, ते पृथ्वीच्या दिशेने साधारणत: अडीचशे फुटांपर्यंत खाली झेपावते. त्याला वेग जास्त असतो. परंतु, ते नुकसान करत नाही. ते पाऊस व ढगांमध्ये विरून जाते, अशी वादळे जगभरात मोठ्या प्रमाणात होतात. अगदी उन्हाळ्यामध्ये देखील होतात. मात्र, आपल्याकडे पावसाळ्यात ढगांचे निरीक्षण केले, तर कधीतरी दिसून येतात म्हणून ती दुर्मिळ असल्याचे म्हटले जाते."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळील मल्हारसागर तलावात दोन वर्षांपूर्वी असेच वादळ जमिनीच्या पृष्ठभागावर जलाशयात तयार होऊन आकाशाकडे झेपावले होते. त्यामुळे प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. आज दुसऱ्यांदा पुरंदर तालुक्यातच हे दुर्मिळ वादळ दिसले आहे. मात्र, हे आकाशात तयार होऊन जमिनीकडे झेपावताना दिसले. पावसाचा जोर वाढल्यानंतर हे वादळ ढगांमध्ये विरल्याचे संदिप बनसोडे यांनी सांगितले.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT