Crime sakal
पुणे

Pune Crime : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून पित्याला अटक

‘गुड टच-बॅड टच’ उपक्रमातून घटना उघडकीस.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुलीला जबरदस्तीने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत असून, हा प्रकार मागील एक वर्षांपासून सुरू होता. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.

या प्रकरणी शाळेच्या शिक्षिकेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २) फिर्याद दिली आहे. त्यावरून पित्याविरुध्द (वय ३५) भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (फ) (आय) (एम), ६५ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉस्को) कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मुलींचे समुपदेशन केले जात आहे. समुपदेशनावेळी शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पीडित ११ वर्षीय मुलीने शिक्षिकेला तिच्यासमवेत घडलेला प्रकार सांगितला.

तिचे वडील मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून मागील एक वर्षापासून शारीरीक संबंध ठेवत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या शिक्षिकेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT