rain in pune 
पुणे

तौक्ते’चा पुण्यावरील प्रभाव अखेर कमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुण्यात काही दिवसांपासून जोरदार वारे आणि पावसाचे सावट कायम होते. मात्र, वादळ गुजरातला पोचल्यानंतर आता प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले. तर सोमवारी (ता. १७) रात्रीनंतर शहर आणि परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मंगळवारी ढगाळ वातावरण होते मात्र पावसाची नोंद झाली नाही. तर बुधवारी (ता. १९) शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तसेच मेघगर्जनेसह हलक्या सरींची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मंगळवारी शहरातील हवामान ढगाळ होते. तर पुढील पाच दिवस म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत (ता. २४) शहरात सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र असेल. मात्र काही प्रमाणात दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Touktea s influence on Pune has finally diminished)

राज्यात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली होती. तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट नोंदली गेली होती. तौक्तेची तीव्रता कमी होत असल्यामुळे याचा परिणाम राज्यावरही दिसून येत आहे. पुढील चार दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात गुरुवारपासून (ता. २०) आणि विदर्भात शुक्रवारपासून (ता. २१) हवामान कोरडे राहणार असल्याचेही हवामान खात्याने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT