वेल्हे - पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करताना पोलिस.
वेल्हे - पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करताना पोलिस. 
पुणे

वेल्ह्यात दुपारी दोननंतर ‘नो एंट्री’

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर - वेल्हे तालुक्‍यातील गडकिल्ले, मढे घाट व वर्षाविहारासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी वेल्हे पोलिसांनी वेळेचे बंधन घातले आहे. त्यामुळे यापुढे दुपारी दोननंतर पर्यटनस्थळी जाता येणार नाही.

वेल्हे तालुक्‍यातील तोरणा व राजगड या किल्ल्यांच्या वाटा जोरदार पावसाने निसरड्या झाल्या आहेत. अंधारात किंवा धुक्‍यात यावरून चालणे धोकादायक होत आहे. मात्र, पर्यटक केव्हाही किल्ल्यावर जातात. येताना त्यांना उशीर होतो. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्याचप्रमाणे मढे घाट धबधब्यांची वाट अरुंद आहे. धुक्‍यात रस्ता न दिसल्याने अपघात होतात. तसेच, अनेक वाहने एकाचवेळी आल्याने वाहतूक कोंडी नेहमी होते. 

वेल्हे पोलिसांनी यासाठी निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये म्हटले आहे की, वेल्हे तालुक्‍यातील पर्यटन स्थळांकडे व किल्ल्यावर सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत; तर मढे घाटावर सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता परत फिरण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.

याबाबत वेल्ह्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक देवकर यांनी माहिती दिली की, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच पर्यटन स्थळावर मद्य घेऊन जाणाऱ्यांवर व प्राशन करणे, असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचारी रोज तपासणी करत आहेत. बेशिस्त वाहन चालवणे, चुकीचे ठिकाणी पार्किंग करणे, यावरदेखील पोलिसांचे लक्ष आहे. नियमांचे पालन करून पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा.

वेल्हे तालुक्‍यात शनिवारी (ता. १३) व रविवारी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची वेल्हे पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये ८८ वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करत २५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची 
माहिती उपनिरीक्षक देवकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT