lingana fort trekking sakal
पुणे

Lingana Fort : लिंगाना किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी आलेला पर्यटक पडला खोल दरीत

लिंगाणा (ता. रायगड) किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेला पर्यटक खोल दरीत पडल्याची घटना सोमवार (ता. २७) रोजी घडली.

मनोज कुंभार

लिंगाणा (ता. रायगड) किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेला पर्यटक खोल दरीत पडल्याची घटना सोमवार (ता. २७) रोजी घडली.

वेल्हे, (पुणे) - लिंगाणा (ता. रायगड) किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या पनवेल मुंबई येथील ग्रुप मधील पर्यटक खोल दरीत पडल्याची घटना सोमवार (ता. २७) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.

अजय काळे राहणार पनवेल मुंबई( पूर्ण नाव व पत्ता मिळाला नाही) वय वर्ष ६२ असे या पर्यटकाचे नाव आहे.

किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून सिंगापूर मार्गे मार्ग आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथील एक ट्रेकर चा ग्रुप आज सकाळी ट्रेकिंग साठी येथे आला असता यातील अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले .दरी जवळपास ४०० फूट खोल असल्याने या ठिकाणी कोणतीही मदत कार्य रात्री उशिरापर्यंत पोहोचलेले नाही.

याबाबत पासली (ता.वेल्हे) येथील माजी सरपंच अंकुश तुपे तसेच पासली आरोग्य केंद्राचे डॉक्टर व इतर नागरिक या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता दरी चारशे फूट खोल असल्याने व या ठिकाणी खाली जाण्यासाठी जवळपास तीन तासाहुन अधिक वेळ लागत असुन अनुभवी ट्रेकर्स व दोरखंड च्या साह्याने उतरण्याचा एकमेव मार्ग असल्याने डॉक्टर घटनास्थळी पोचू शकले नाहीत.

वेल्हे पोलिसांशी संपर्क केला असता ते म्हणाले, लिंगाणा किल्ला रायगड हद्दीमध्ये असून याबाबत रायगड पोलिसांशी संपर्क साधला असून वेल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. के. कदम ,पोलीस हवालदार प्रदीप कुदळे ,पोलीस कॉन्स्टेबल वाय. के सोमवंशी व स्थानिक नागरिक घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी कोणतेही कोणत्याही मोबाईल नेटवर्क ( रेंज) नसल्याने संपर्क करण्यास अडथळा येत आहे.याबाबत वेल्हे पोलिस म्हणाले मुंबई येथील अनुभवी ट्रेकर्स व क्रेन निघाली असून पर्यटकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT