पुणे

राजगड, तोरणा गडावर पर्यटकांना बंदी

तालुकास्तरीय बैठकीत घेतला निर्णय

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड, किल्ले तोरणा येथे जाण्यास पर्यटकांना लॅाकडाऊन असेपर्यत बंदी घालण्यात आली असल्याचा निर्णय शुक्रवार (ता.११) आयोजित तालुकास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

वेल्हे तहसील कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसिलदार शिवाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, गोपनीय विभागाचे अभय बर्गे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, वेल्ह्याचे सरपंच संदीप नगिने, राजगड पायथा पाल बुद्रुकचे सरपंच गोरक्ष शिर्कें, संतोष मोरे, आदीसह किल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावचे सरपंच उपस्थित होते.

५ जुन रोजी किल्ले तोरणा किल्ल्यावरील बुरुजांची नासधुस केली होती,तसेच किल्ल्यावर पर्यटकाकडुन मोठ्या प्रमाणावर कचरा राडारोडा इतरत्र टाकला जात आहे.किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

''किल्ल्यावर मुक्काम करण्यास देखील बंदी असल्याच्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर कोणी सापडला तर त्या पर्यटकावर गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच वनविभागाकडून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वनसंरक्षण समिती स्थापन करावी आणि ती कार्यन्वित करुन किल्ल्याच्या पायथ्याजवळ चेकपोस्ट सुरु करावेत'' अशी चर्चा यावेळी करण्यात आली. पोलिसांकडून करंजावणे, चिरमोडी वाजेघर कोंढावळे फाटा या ठिकाणी चेकपोस्ट सुरु असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT