Khadakwasla_Dam 
पुणे

काय म्हणावं या पुणेकरांना! प्रशासनाचे आदेश झुगारत खडकवासल्यावर केली गर्दी

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसर पर्यटकांसाठी बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट आदेश असतानाही पर्यटकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारत खडकवासला धरण परिसरात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या पुलावर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

खडकवासला धरणातून सध्या सुमारे ११ हजार क्युसेकने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक धरण परिसरात येतात; परंतु यावर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खडकवासलासह जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद राहतील, असे आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश झुगारत अनेक पर्यटकांनी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या अरुंद पुलावर गर्दी केली होती.

पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यातच लावल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. फोटो आणि सेल्फी काढण्याच्या नादात अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालताना दिसून आले. धरणाच्या मागील बाजूस असलेला पूल हा उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो, मात्र सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही.

"सध्या धरणातून अकरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नागरिकांनी धरण परिसरात फिरण्यासाठी येऊ नये. उत्तमनगर पोलिस स्टेशनशी संपर्क साधून धरणामागील पुलावर तात्काळ सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त लावण्याची मागणी करणार आहे."
- वामन भालेराव, उपअभियंता, स्वारगेट उपविभाग, पाटबंधारे विभाग.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT