पुणे

शहरालगत पंधरा ठिकाणी टीपी स्किम - पालकमंत्री 

सकाळवृत्तसेवा

पुणे - नगर रचना योजना (टीपी स्किम) राबविल्यामुळे सर्व नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे शहरालगत नियोजनबद्ध 15 टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. हे काम पीएमआरडीए करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) होळकरवाडी (ता. हवेली) येथील रिंगरोडला जोडणाऱ्या नवीन मुख्य होळकरवाडी रस्ता ते कानिफनाथ पायथा रस्ता विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, उपसभापती सचिन घुले, होळकरवाडीच्या सरपंच मंगल झांबरे, उपसरपंच गणेश कऱ्हे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

या वेळी पालकमंत्री बापट म्हणाले, ""पीएमआरडीएच्या हद्दीत पुढील काळात पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण गरजेचे आहे. त्याचाही विचार करण्यात येणार आहे.'' 

ही होणार कामे 
होळकरवाडी येथील दोन किलोमीटर रस्त्याच्या कामकाजासाठी 4 कोटी 63 लाख खर्च येणार आहे. हे काम नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये रुंदीकरण, डांबरीकरण, मोऱ्या, गटारीचे काम केले जाणार आहे. तसेच होळकरवाडीपासून पुरंदर तालुक्‍यातील कानिफनाथ मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच, प्रस्तावित रस्ता रिंगरोडला जोडणारा असल्याने वाहनांची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT