उसाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह
विहिरीत कोसळला
एकाचा मृत्यू, एक जखमी; शिरढोण शिवारातील दुर्दैवी घटना
शिराढोण, जि. धाराशीव : शिवारात सुरू असलेल्या ऊस तोडणीदरम्यान ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी, तर एक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली.
येथील शेतकरी अंनिस मजारोद्दीन दखणी यांच्या शेतात येडेश्वरी साखर कारखान्याची ऊस तोडणी सुरू होती. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत उसाची भरणी करण्यात आली. शुक्रवारी (ता. २३) सकाळी सात ते साडेसात वाजता उसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढताना शेजारच्या औदुंबर उर्फ भाऊराव ज्ञानदेव जाधवर यांच्या शेतातील अंदाजे ७० फूट खोल असलेल्या विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळला. या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला, तर एक गंभीर जखमी आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली आणि दोन हेड घेऊन जात असताना ट्रॅक्टरसह संपूर्ण साहित्य विहिरीत पडले. या घटनेत ट्रॅक्टर मालक गणेश पांडुरंग टेकाळे (वय २६, रा. डोळा पिंपळगाव, ता. कळंब, जि. धाराशीव यांचा मृत्यू झाला, तर चंद्रकांत दिनेश कांबळे (रा. इस्थळ, ता. केज, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. त्यांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, विहिरीतील पाण्यात अडकलेला ट्रॅक्टर, उसाने भरलेली ट्रॉली आणि दोन हेड बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सायंकाळी सुरू होते.या घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.