मार्केट ट्रेण्ड ः ट्रॅक्टरनेक्स्ट
-----------------------
कृषी उपकरणे खरेदीसाठी ‘ट्रॅक्टरनेक्स्ट’ मार्केटप्लेस सज्ज
पुणे : कृषी यांत्रिकीकरण आणि ग्रामीण उपकरण क्षेत्रातील पुढच्या पिढीचे अॅग्री-टेक व्यासपीठ ‘ट्रॅक्टरनेक्स्ट’चे अनावरण ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनचे (TMA) अध्यक्ष जी. एस. ग्रेवाल यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २७) पार पडले. या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर अॅग्री ड्रोन, ट्रॅक्टर, शेती अवजारे, बुलडोझर, ओटीआर टायर्स आणि इतर उपकरणांची माहिती शेतकरी, ग्रामीण उद्योजक आणि खरेदीदारांना सुलभपणे मिळणार आहे.
कृषी यांत्रिकीकरणामध्ये झपाट्याने बदल होत असताना उपकरणांची उपयुक्तता, कार्यक्षमता, तंत्रज्ञान, परिचालन खर्च आणि दीर्घकालीन मूल्य या निकषांवर उपकरणांचे मूल्यमापन करावे लागते. ही गरज ओळखून ट्रॅक्टरनेक्स्ट हे व्यासपीठ उत्पादनांची माहिती, तुलना साधने आणि संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करणार आहे. अनावरण प्रसंगी बोलताना टीएमएचे अध्यक्ष जी. एस. ग्रेवाल म्हणाले, ‘‘आज शेतकऱ्यांसमोर उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायातून गरजेनुसार योग्य उपकरण किंवा तंत्रज्ञानाची निवड करणे आव्हान ठरत आहे. अशा वेळी विश्वासार्ह माहिती व विविध पर्यायांची तुलना करून योग्य त्या उपकरणाची निवड करण्यामध्ये हा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अंतिमतः कृषी यांत्रिकीकरणाचा खरा उद्देश शेतकऱ्यांची उत्पादकता, कार्यक्षमता आणि आर्थिक उत्पन्न वाढवणे हाच आहे.’’
ट्रॅक्टरनेक्स्ट या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश कृषी उपकरणे उत्पादक कंपन्या (OEMs) आणि पुरवठादारांना डिजिटल ओळख मिळवून देणे, त्यांना प्रादेशिक बाजारपेठांमध्ये पोहोचविणे आणि थेट ग्राहकांशी जोडणे हा आहे. सध्या एकाच व्यासपीठावर देशी विदेशी शंभरहून अधिक ब्रँड्स आणि एक हजाराहून अधिक उत्पादने सादर करण्यात येत आहेत. नावीन्यपूर्ण उपकरणांचा शोध, स्थानिक भाषेतील संवाद आणि बाजारपेठेतील सहभाग या सर्वांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा या प्लॅटफॉर्मचा मानस असल्याचे ‘ट्रॅक्टरनेक्स्ट’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू धस यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कृषी यंत्रसामग्री उद्योग, उपकरण वितरण, कृषी-तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री. जी. एस. ग्रेवाल लिखित ‘लीडर अॅज अ कोच’ (Leader as a Coach) या पुस्तकाचेही सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.