पुणे

वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

CD

मांडवगण फराटा, ता. १४ : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील कारखाने व गुऱ्हाळचालकांना ऊस पुरविण्यासाठी लगबग सुरू आहे. न्हावरे-चौफुला राष्ट्रीय महामार्ग, न्हावरे-बीड राष्ट्रीय महामार्ग तसेच आंधळगाव-तांदळी राज्य मार्गावर ऊस भरण्यासाठी थेट रस्त्यावरच ट्रॅक्टर ट्रॉल्या उभ्या करण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी या ट्रॉल्या कोणतेही रिफ्लेक्टर किंवा पार्किंग दिवे न लावता धोकादायक पद्धतीने उभ्या असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उसाच्या ट्रॉल्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावरच उसाच्या ट्रॉल्या उभ्या करून ऊस भरण्याचे काम केले जाते. या ट्रॉल्या अनेकदा रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच उभ्या असतात. अंधारात त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालक थेट ट्रॉल्यांवर जाऊन आदळतात. यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मांडवगण फराटा-कोळगाव डोळस रस्त्यावर नुकतीच इलेक्ट्रिक दुचाकीची उसाच्या ट्रॉलीला धडक बसून अनिकेत अविनाश शेलार हा तरुण गंभीर जखमी झाला तर कुरुळी येथे सोमवारी (ता. ९) रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीला पिकअप टेम्पोची धडक बसून काही कामगार जखमी झाले.
गणपतीमाळ ते मांडवगण फराटा रस्त्यावर १७ जुलै २०२२ रोजी उसाच्या ट्रॉलीला धडकून संतोष भरत शेलार (वय २५, रा. गणपती माळ) यांचा मृत्यू झाला होता. निर्वी येथे ४ सप्टेंबर २०२२ रोजी सखाराम विश्वनाथ सरके (वय २७, रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर) यांचा ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता.

कारवाईचा बडगा उगारणार कधी?
रस्त्यावर विनासुरक्षा उभ्या राहणाऱ्या उसाच्या ट्रॉल्यांवर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर आणि पार्किंग दिवे लावणे बंधनकारक करावे. रस्त्यावर ऊस भरण्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी योगेश शेलार व बबलू पाटील शेलार यांनी केली आहे.


शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात रात्रीच्या वेळी उसाच्या उभ्या असलेल्या ट्रॉल्या वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेशिस्त ट्रॅक्टर मालकांवर गुन्हे दाखल करावेत.
- संपत फराटे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर


3769, 3770

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT