पुणे

बारामतीत सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

मिलिंद संगई

बारामती : लॉक़डाऊनला कंटाळलेल्या बारामतीच्या व्यापाऱ्यांनी आता एल्गार पुकारला आहे. एकीकडे शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनला सहकार्य करण्याची भूमिका घेताना दुसरीकडे सोमवारपासून नियमितपणे दुकाने उघडण्याचा निर्णय आज बारामतीतील व्यापाऱ्यांनी घेतला. 

एकीकडे सरकारने अद्यापही दुकाने सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही, मात्र व्यापाऱ्यांनी आता काहीही झाले तरी सोमवारी सकाळी नऊ वाजता दुकाने उघडायचीच, असे ठरवले आहे. आज बारामती व्यापारी महासंघाचा हा निर्णय अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहचविला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासूनच व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती, दुकाने बंद ठेवण्याची कोणाचीच आता तयारी नसल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले.

आज बारामतीत व्यापाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीस अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सचिन सातव, सुशील सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फखरु भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी यांच्याह अनेक व्यापारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फॅम यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला. तथापि सोमवार (ता. 12) पासून सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत उघडावीत असेही यात एकमताने निश्चित झाले. सरकारने दिलेल्या कोव्हिड 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असेही आवाहन नरेंद्र गुजराथी यांनी केले. 

गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिकदृष्टया डबघाईला आला आहे, आता या पुढे लॉकडाऊन न परवडणारा आहे, त्या मुळे आमची शासनाला विनंती आहे की, शासनाने व्यापा-यांचा अंत बघू नये, सोमवारच्या आत सकारात्मक निर्णय घ्यावा.-नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी  महासंघ. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT