pune transport esakal
पुणे

Pune Transport : मोहरम सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

पुणे शहरात शनिवारी (ता. २९) मोहरम सणानिमित्त ताबूत, पंजे यांचे विसर्जन करण्यासाठी मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात शनिवारी (ता. २९) मोहरम सणानिमित्त ताबूत, पंजे यांचे विसर्जन करण्यासाठी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्गांवर बदल करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी दिली.

मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार काही कालावधीसाठी बंद किंवा वळविण्यात येणार आहे. मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. वाहन चालकांनी संबंधित मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त मगर यांनी केले आहे.

मुख्य मिरवणूक (दुपारी तीन वाजता)

मार्ग : श्रीनाथ टॉकीज येथून दत्त मंदिर बेलबाग चौक- बुधवार चौक - जिजामाता चौक- डावीकडे वळून शनिवारवाडा फुटक्या बुरुजास वळसा घालून शनिवारवाड्यासमोरील गाडगीळ पुतळा चौक- उजवीकडे वळून डेंगळे पूल - रेल्वे पुलाखालून आरटीओ चौक ते संगम पूल याठिकाणी विसर्जन.

लष्कर मिरवणूक (दुपारी १२ वाजता)

मार्ग :- ताबूत स्ट्रीटपासून बाटलीवाला बगीचा- सरबतवाला चौक- बाबाजान दर्गा- गावकसाब मशीद- डावीकडे वळून एम. जी. रस्त्याने कोहिनूर चौक- नाझ हॉटेल चौक- डावीकडे वळून बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौकात दुपारी दोनच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर मिरवणूक पुढे नेहरू मेमोरिअल हॉल- जुना समर्थ पोलिस ठाणेमार्गे डावीकडे वळून के. ई. एम. रुग्णालयासमोरुन दारुवाला पूल- फडके हौद चौक- बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे मुख्य मिरवणुकीत सहभागी होते.

खडकी भागातून निघणारी मिरवणूक (सायंकाळी ६.४५ वाजता)

मार्ग :- ताबूत मिरवणूक बोपोडी चौकातून मुंबई-पुणे रस्त्याने दापोडीतील नदी किनारी विसर्जन होणार आहे.

पाटील इस्टेट गल्ली क्रमांक दहा- मिरवणूक (दुपारी दोन वाजता)

मार्ग :- रेशीम विभाग व दूध डेअरीजवळील ताबूत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येऊन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. पाटील इस्टेट येथील ताबूत मिरवणूक संगम पूल या ठिकाणी विसर्जित होणार आहे.

इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक (सकाळी १०.३० वाजता)

मार्ग :- इमामवाडा लष्कर- आगाखान कंपाउंड ते परत इमामवाडा मार्ग, नेहरू मेमोरिअल चौक, डावीकडे वळून पोलिस आयुक्त कार्यालयासमोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधू वासवानी चौक, १३ कॅनॉट रोड, आगाखान कंपाउंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT