Pune Traffic Changes esakal
पुणे

Pune Traffic Changes: रमझान ईदनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Changes: गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १० : रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या परिसरात गुरुवारी (ता. ११) सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद राहील.

पर्यायी मार्ग - गोळीबार चौकातून डावीकडे वळून सी.डी.ओ.चौकापुढे उजवीकडे वळून गिरिधर भवन चौक- उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग - लुल्लानगरकडून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक- नेपियर रस्ता- मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक- भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाता येईल. (Pune Traffic Update)

सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग- सॅलिसबरी पार्क - सी.डी.ओ. चौक - भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.

सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाण्यास बंदी राहील.

पर्यायी मार्ग- वाहने मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वळून पुढे किंवा नेपियर रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग- भैरोबानाला ते एम्प्रेसगार्डन मार्गे किंवा लुल्लानगरमार्गे वाहतूक सोडण्यात येईल.

कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड,अवजड मालवाहतूक वाहने, प्रवासी आणि पीएमपी बसेस यांना प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग- लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.

याशिवाय कोंढवा आणि शहरातील इतर भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. त्या भागातील वाहतूक परिस्थितीनुसार वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

शहरात १४१ मशिदीत होणार नमाज पठण-

गोळीबार मैदान, हडपसर, पर्वती दर्शन आणि खडकी येथील ईदगाह मैदानांसह १४१ मशिदीत नमाज पठण होणार आहे. सकाळी सात ते ११.३० या कालावधीत नमाज पठण करण्यात येणार आहे, अशी माहिती रविवार पेठेतील हिलाल कमिटीकडून (चाँद कमिटी) देण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

SCROLL FOR NEXT