Traffic changes in Swargate area due to kasba bypoll election pune politics
Traffic changes in Swargate area due to kasba bypoll election pune politics sakal
पुणे

Pune Traffic : मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागात वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा पेठ विधानसभा निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वारगेट परिसरात २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्गातून सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच, नटराज हॉटेल येथून सारसबागेकडे जाणाऱ्या भुयारी मार्गालगतच्या उजवीकडील सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

त्याऐवजी या रस्त्यावरील वाहने जेधे चौकातील भुयारी मार्गालगतच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याने वळविण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते रात्री ९.३० वाजेपर्यंत ही या मार्गावरील वाहतूक बंद राहील.

निवडणूक कर्मचारी मतदानाचे साहित्य गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहेत. मतदानाचे साहित्य सुरक्षित वेळेत पोचण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT