Pune Traffic  Sakal
पुणे

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत शुक्रवारपासून (ता. १७) बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी - उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : चाफेकर चौक - सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.

न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.

स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - सिमला ऑफिस चौक-डावीकडे वळून चाफेकर चौक- उजवीकडे वळून न.ता. वाडी चौक- उजवीकडे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून एस. टी. स्टँड सर्कलवरून न.ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

सिमला चौकाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एल.आय.सी कडील बाजूने वीर चाफेकर उड्डाणपुलावरून जावे. वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT