पुणे

वासुलीत ड्रोन चित्रीकरणाचा स्टंट महागात

CD

चाकण, ता. ८ : चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली (ता. खेड) येथे रस्त्यावर वाहने आडवी लावून ड्रोनने चित्रीकरण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी राम राऊत, आदित्य निखाडे (दोघे रा. भांबोली), साहिल जांभळे (रा. वासुली), प्रणव पाचपुते (रा. वासुली, ता. खेड) यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार सोमवारी (ता. ७) गुन्हा दाखल करण्यात आला.
वासुली हद्दीतील संत तुकाराम चौक ते मिंडेवाडी रस्त्यावर बुधवारी (ता. ३) रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपींनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्यूनर, स्कॉर्पिओ व इतर दोन मोटारी समांतर चालवून आणि अचानक थांबवून चित्रीकरण केले. याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस हवालदार संपत मुळे यांनी फिर्याद दिली. यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली. दरम्यान, पाचपुते बाहेरगावी असल्याने राऊत, निखाडे, जांभळे या तिघांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या तिघांनाही समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती उत्तर महाळुंगेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT