ex.jpg
ex.jpg 
पुणे

महत्वाची बातमी : पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करताय का?; मग ही बातमी नक्की वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे ः जिल्हातंर्गत प्रवासाला खासगी वाहनांतून परवानगी मिळाल्यामुळे  मुंबई, सातारा, नगर, नाशिक आणि सोलापूर रस्त्यांवरील वाहतूक पूर्वीच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे विशेषतः नोकरदार, उद्योग- व्यावसायिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वाहतूक वाढल्यामुळे पोलिसांनाही आता नियमनाला सुरवात केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एरवी 27 ते 30 हजार वाहनांची रोज वाहतूक होते. सध्या ही वाहतूक 17 हजार वाहनांपर्यंत पोचली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी 25 मार्चपासून देशातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातंर्गत आणि आंतरजिल्हा वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने त्या बाबत शिथिलता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने फक्त जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे तर आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी मिळालेली नाही. 

मुंबई रस्त्यावर लोणावळा, सातारा रस्त्यावर शिरवळच्या पुलापर्यंत, नाशिक रस्त्यावर आळेफाटा, सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णी आणि नगर रस्त्यावर शिरूरपर्यंत पुण्याची हद्द आहे. या परिसरातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी, उद्योग- व्यवसाय, शिक्षण आदी कारणांसाठी येणाऱयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातंर्गत वाहतूक खुली झाल्यावर या रस्त्यांवरील वाहतुकीत एकदम वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत ती सध्या 70 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. सार्वजनिक वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे रस्त्यांवर खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच पेट्रोलपंप आणि काही प्रमाणात हॉटेल्सही खुली झाली आहेत. त्यामुळेही वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. 

लॉकडाउन सुरू झाल्यावर शहरातील राहणारे अनेकजण गावाकडे गेले होते. परंतु, लॉकडाउनमध्ये टप्पयाट्प्याने शिथिलता मिळत आहेत. त्यामुळे त्यांना शहरात परत यायचे होते. त्यातच आता जिल्ह्यातंर्गत वाहतूक सुरू झाल्यामुळे ते परतले आहेत. खासगी कार्यालयेही आता अल्पावधीत सुरू होणार आहेत. त्यामुळेही येणाऱया कर्मचाऱयांचे प्रमाण वाढले आहे.   

द्रुतगती मार्गावरही वाहतूक वाढली- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एरवी 27 ते 30 हजार वाहनांची रोज वाहतूक होते. सध्या ही वाहतूक 17 हजार वाहनांपर्यंत पोचली आहे. व्यवसाय, उद्योगासाठी तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया वाहनांची त्यात संख्या मोठी आहे. या रस्त्यावर जिल्ह्याची सीमा आेलांडण्यासाठी पासची सक्ती आहे. त्यानुसारच सोडले जात आहे. 

शेतकरी सुखावले- लॉकडाउनच्या काळात शहरात भाजीपाल्याची चणचण सुरू झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातून थेट सोसायटीच्या आवारात भाजीपाला विकण्यास सुरवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हीच पद्धत आता रूटीन होऊ पाहत आहे. सोसायट्यांमधील नागरिकांनाही घरापर्यंत भाजी उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱयांना घाऊक बाजारपेठेपेक्षा किरकोळ दरात विक्री करण्यात तुलनेत फायदा जास्त होत असल्यामुळे ते सुखावले आहेत. 

द्रुतगती मार्गासह पुण्यालगतच्या चारही रस्त्यांवरील वाहतूक आता 70 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. तर आंतरजिल्हा वाहतुकीचे प्रमाण 40- 50 टक्के आहे. त्यासाठी पास लागत आहे. वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नियमनही सुरू झाले आहे.-मिलिंद मोहिते, अधीक्षक, महामार्ग पोलिस

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

Marathi News Live Update: नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ एसटी-अल्टोचा अपघात; अडीच वर्षांचं बाळ गंभीर जखमी

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

SCROLL FOR NEXT