हिंजवडी - शिवाजी चौक परिसरात बॅरिकेड बाजूला करून वाहनांची घुसखोरी सुरू असते, त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. 
पुणे

वाहतुकीचा चक्रव्यूह

सुधीर साबळे

पिंपरी - उलट्या दिशेने येणारी वाहने, डबल आणि रस्त्यालगत केलेले पार्किंग, अनधिकृत हातगाड्या आदी अनेक समस्यांमुळे हिंजवडीत राबविण्यात येत असणाऱ्या चक्राकार वाहतुकीची ‘ऐशी तैशी’ होत असल्याचे समोर आले आहे. 

हिंजवडीतील चक्राकार वाहतुकीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे बोलले जात असले, तरी या समस्या वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 

‘विप्रो’जवळील स्थिती धोकादायक
शिवाजी चौकाकडून विप्रो सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी झालेली असते. विप्रो कंपनीच्या बाहेर प्रवासी घेण्यासाठी रिक्षा आणि अन्य खासगी वाहने थांबलेली असतात. अनेकदा येथे बसच्या रांगा असतात. चक्राकार वाहतुकीमुळे विप्रो सर्कलकडून जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू असते. त्यातच या रस्त्यावरील इंडिया लॅंड ग्लोबल इंडस्ट्रिअल पार्कसमोरील दुभाजक बंद केला आहे. मात्र दुचाकीस्वार हे दुभाजक बाजूला करून घुसखोरी करतात. यामुळे या परिसरात अपघात होण्याची शक्‍यता आहे. 

रस्त्यावरचा ताण वाढला
चक्राकार वाहतुकीमुळे एकाच रस्त्यावरील ताण वाढला आहे. हा प्रयोग कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असल्यास वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे.

अचानक वळणाऱ्यांमुळे धोका
हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने वळण्यासाठी थांबतात. प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत हे प्रकार घडतात. यामुळे या परिसरात अपघाताची शक्‍यता आहे.

काय आहेत समस्या? 
आयटी पार्कमधून येणाऱ्या वाहनांना शिवाजी चौकातून सरळ जाता यावे म्हणून वाकड चौकापर्यंत जड वाहनांसाठी हा रस्ता बंद केला असला, तरी या चौकामध्ये वाहने, हातगाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहनांना जाताना अडचण होते. चक्राकार वाहतुकीमुळे एका मार्गातील वाहनांना पलीकडच्या बाजूला जाता येऊ नये, म्हणून पोलिसांनी या मार्गावर तीन ठिकाणांचे पंक्‍चर बंद केले आहेत. मात्र अनेक वाहनचालक पंक्‍चरच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्‌स बाजूला करून घुसखोरी करतात. चुकीच्या दिशेने येणारी वाहने चक्राकार वाहतुकीत खोडा घालतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यात अडचणी येतात.

वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून बंद केलेले दुभाजक काहीजण काढतात. त्याची दखल घेतली असून हे पंक्‍चर कायमस्वरूपी बंद करणार आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर जॅमरची कारवाई करण्यात येत आहे. आयटी पार्कच्या परिसरात नो पार्किंग करायची ठिकाणे एमआयडीसी नक्‍की करणार आहे. यासंदर्भातील यादी वाहतूक पोलिसांकडे आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. 
- किशोर म्हसवडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, हिंजवडी विभाग 

हिंजवडीत राबविण्यात येणारा चक्राकार वाहतुकीचा प्रयोग आयटीयन्सला उपयुक्‍त ठरत आहे. मात्र त्यात थोड्या प्रमाणात बदल करण्याची अपेक्षा आहे. शिवाजी चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा असावी आणि तेथील सिग्नलचा वेळ वाढवण्याची आवश्‍यकता आहे. 
- मनोज कलमाडे, संगणक अभियंता

हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येणारा चक्राकार वाहतुकीचा प्रयोग चांगला आहे. त्यात काही त्रुटी असतील तर पोलिस त्या पूर्ण करतील. वाहतूक व्यवस्थेतील बदलासंदर्भात नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार लवकरच सकारात्मक बदल घडू शकतील. 
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT