Traffic Sakal
पुणे

पुणे : 'महाराष्ट्र बंद' आंदोलनामुळे फातिमानगर चौकात वाहतूक कोंडी

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरीमधील शेतकऱ्यांवर झालेल्या निर्दयी कृत्याविरूध्द पुकारण्यात आलेल्या बंदला वानवडीत संमिश्र प्रतिसाद.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरीमधील शेतकऱ्यांवर झालेल्या निर्दयी कृत्याविरूध्द पुकारण्यात आलेल्या बंदला वानवडीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या वतीने वानवडीतील संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन 'महाराष्ट्र बंद' च्या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. महाराष्ट्र बंद निमित्त वानवडी पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रॅलीत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक शिवाजी केदारी, अभिजित शिवरकर, साहिल केदारी, मकरंद केदारी, दिलीप जांभूळकर, प्रफुल्ल जांभूळकर, केविन मँन्यूअल व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीने आझादनगर, साळुंखे विहार, केदारीनगर, शिवरकर रस्ता या मार्गे दुचाकी रॅली काढण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्त्यांवरील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

रॅली सोलापूर रस्त्यावरील फातिमानगर चौकात आल्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सोलापूर रस्ता व शिवरकर रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. काही वेळाने मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. त्यानंतर वानवडीतील जनजीवन पुर्वपदावर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT