pune-satara-road
pune-satara-road 
पुणे

पुणे- सातारा रस्त्यावर लोखंडी रोलिंगच्या अडथळ्यामुळे वाहतूक कोंडी

सकाळवृत्तसेवा

सहकारनगर - पुणे सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गावर लोखंडी रोलिंग उभारण्यात आले आहेत. पंचमी चौकातून हडपसर व सारसबागकडे जाण्यासाठी वाहन चालकांना उड्डाणपूल वरून जावे लागते आणि स्वारगेटकडे जायचे असेल तर बीआरटी मार्गातून लक्ष्मी नारायण टॉकीजकडून जावे लागत आहे. यामुळे स्वारगेट,सारसबाग व हडपसरकडे जायचे म्हंटले की वाहनचालकांची कोंडी होत आहे.

उड्डाणपूल पासून ते पंचमी चौक पर्यंत लोखंडी रोलिंग असल्याने उजव्या बाजूने जायचे म्हंटले की मागून येणाऱ्या गाड्याना अडथळा निर्माण होतो.त्यामुळे स्वारगेटकडे जायचे म्हंटले की दिशाभूल होत आहे. यामुळे पंचमी चौकात सकाळ,सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होते.

बीआरटी मार्गात उभारण्यात आलेल्या लोखंडी रोलिंगमुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.यामुळेच याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.याठिकाणी उभारण्यात आलेले लोखंडी रोलिंग चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच उड्डाणपूल पासून ते पंचमी चौक पर्यन्त लोखंडी रोलिंग असल्याने एस.टी. कॉलनी, साईबाबा वसाहतीतील नागरीकांना रस्ता ओलांडताना लक्ष्मीनारायण टॉकीकडून किंवा पंचमी चौकातून फिरून जावे लागत आहे. यामुळे येथील लोखंडी रोलिंग चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याने ते काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. यावेळी पुरंदर पुजारी म्हणाले, सातारा रस्त्यावरील पंचमी चौकातून स्वारगेट, सारसबाग, शिवाजीनगर , हडपसर कडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने यामार्गातून जात असतात.

रोलिंगच्या अडथळ्यांमुळे वाहनचालकांना कोणच्या बाजूने जायचे कळत नसल्याने दिशाभूल होत असते. परिणामी मोठ्या प्रमाणात मागुन येणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात.यामुळे अपघातग्रस्त लोखंडी रोलीन काढण्यात यावे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा रस्त्यावरील पंचमी चौकातून स्वारगेट, सारसबाग, शिवाजीनगर ,हडपसर कडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने यामार्गातून जात असतात.लोखंडी रोलिंगच्या अडथळ्यांमुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. याबाबतचे निवेदन पीएमपीएल विभागकडे देण्यात आले आहे.
अतुल नवगिरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग स्वारगेट)

सातारा रस्त्यावरील पंचमी चौक, सिटी प्राईड चौक येथील बस थांबा जवळ उभारण्यात आलेले लोखंडी रोलिंग चुकीच्या पध्दतीने उभारण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून पंचमी चौकातून महर्षीनगरकडे जाताना वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. 
- दिनेश खराडे,महर्षीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT