FatimaNagar-Traffic 
पुणे

पुणे : पीएमपी बंद पडल्याने ट्रॅफिक जॅम; एक किलोमीटर अंतरासाठी लागले दोन तास!

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : फातिमा नगर चौकात पीएमपी बस बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे फातिमा नगर, वानवडी, सोलापूर रस्ता, राष्ट्रीय युद्ध स्मारक, रेसकोर्स शेजारील जकात नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा यामुळे नागरिक हैराण झाले. 

यामुळे सोलापूर रोडवर एम्प्रेस गार्डन शेजारी पुणे कॅन्टोन्मेंटच्या दोन्ही जकात नाका जवळ आणि सोपान बाग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राष्ट्रीय युद्ध स्मारक ते फातिमा नगर या संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कॅम्प मधून घोरपडीकडे येणारा रास्ता संपूर्ण ठप्प पडला होता. वाहनचालकांना एक किलोमीटर अंतरासाठी दोन-तीन तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तसेच चौकात ट्राफिक सिग्नल कार्यरत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. या वाहतूक कोंडीत एक ते दोन रुग्णवाहिका अडकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

साधारण एक तासानंतर पी एम पी एल बस चौकातून हटवण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. तोपर्यंत रस्त्यावर हजारों गाड्या अडकून पडल्या होत्या. रोज फातिमा नगर चौकात संध्याकाळी एक ते दीड तास वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. हा रस्ता रुंदीकरण किंवा येथे उड्डाणपूल होण्याची गरज आहे. परंतु राजकीय इच्छशक्ती नसल्यामुळे नागरिकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

- जितेंद्र जगताप, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

SCROLL FOR NEXT