पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

रविंद्र पाटे

नारायणगाव : टोमॅटो वाहतूक करणारी वाहने महामार्गालगत उभी केल्याने येथील पुणे नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी होत आहे. आज सकाळी महामार्गावर येथील टोमॅटो उपबजार ते नारायणगाव बसस्थानक दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांब वाहतुकीची रांग लागली होती. या मुळे वाहन चालक, प्रवाशी व टोमॅटो विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक समस्या सोडवण्यासाठी टोमॅटो उपबजारा लगत असलेला मांजरवाडी रस्ता व बाह्यवळण रस्ता वाहतूकिसाठी खुला करणे आवश्यक आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजार आवराला चार प्रवेशव्दार आहेत. या पैकी दोन प्रवेशद्वार मांजरवाडी रस्त्याच्या कडेला आहेत.या प्रवेशव्दाराचा उपयोग उपबजार आवारात टोमॅटो व भाजीपाल्याची ने आण करण्यासाठी केला जात होता.

मात्र मागील एक वर्षा पासून अष्टविनायक रस्ते जोड प्रकल्पा अंतर्गत मांजरवाडी रस्त्याचे काम सुरू असल्याने उपबजार आवाराचे दोन प्रवेशद्वार बंद आहेत.या मुळे सध्या टोमॅटो उपबजारात नेण्यासाठी महामार्गालगतच्या रस्त्याचा वापर केला जात आहे.या मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.ही समस्या सोडवण्यासाठी मांजरवाडी व बाह्यवळण रस्ता दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून वाहतूकिसाठी खुला करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT