pune-traffic.jpg 
पुणे

गणेशोत्सवापूर्वीच पुण्यात वाहतूक कोंडीचा 'जीवंत देखावा'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात व पेठांमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून त्याचा कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
 

गणेश मंडळांची तयारी आणि अनेक रस्त्यावर गणेश मंडळांचे मंडप असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. मध्य भागातील पेठांतील रस्ते, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि नदीपात्र या भागात आज सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त खरेदी करण्यासाठी उपनगरातील नागरिक शहरात येत असल्याने पेठांतील अनेक रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.

शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता या महत्त्वाच्या रस्तायवरील वाहतूक देखील अतिशय मंद झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल करूनही पुणेकरांना शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्य भागात पुढील काही दिवस वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी या भागात येताना याचा विचार करून यावे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT