पुणे

पुणे-मुंबई महामार्गावर कोंडी

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सण सरल्याने दिवाळीच्या सुट्यांमुळे लोणावळा व खंडाळा पर्यटकांनी गजबजला आहे. येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

दिवाळी व भाऊबीजेनंतर साधारणतः लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. दिवाळीत सध्या सुट्यांची मजा लुटण्याचा नवा ट्रेंड पडत चालल्याने थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि गुजरात येथील पर्यटकांचा अधिक भरणा आहे. लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे राहिली आहेत. 

पावसाळी हंगामासह भुशी धरण, लोणावळा तलाव, राजमाची, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व मोसमात पर्यटक गर्दी करतात. 

लायन्स पॉइंट, पवनानगर परिसरातील खासगी बोटींग क्‍लब, लोणावळा परिसरातील वॉटरपार्कला पर्यटकांची पसंती मिळत आहे. लोहगड, राजमाची परिसरातही हौशी ट्रेकर्स सध्या भेट देत सुटीची मजा लुटत आहेत. यात कुटुंबवत्सल पर्यटकांबरोबर तरुण-तरुणी, आबालवृद्धांचा समावेश आहे. ऐन दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस, वाहतूक कोंडीमुळे काही अंशी व्यवसायावर मंदीचे सावट होते. मात्र, पर्यटकांची गर्दी होत असल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य आहे.

कार्ला येथील एमटीडीसी रिसॉर्टला पसंती मिळत अाहे. येथील वॉटरपार्क पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून, पर्यटकांची पसंती मिळत आहे.
- महादेव हिरवे, व्यवस्थापक, एमटीडीसी
  
सध्याचा विकेंड फुल्ल गेला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुढील आठवडाभरामध्ये पर्यटकांची वर्दळ कायम राहण्याची शक्‍यता असून येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टचे दिवाळीनंतरचे ६० ते ७० टक्के बुकिंग झाले.
- आशिष खंडेलवाल, हॉटेल व्यावसायिक

वाहतुकीवर ताण 
पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या अपोलो गॅरेज ते हॉटेल कैलाश पर्वतदरम्यान लांब रांगा लागल्या होत्या. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात वाहतूक संथ गतीने सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT