traffic planning after flyover Chandni Chowk is demolished pune  sakal
पुणे

Fact Check : चांदणी चौकातील पूल पडल्यावर वाहतुकीचे नियोजन 'व्हायरल', अधिकाऱ्यांचं उत्तर

चांदणी चौकातील फ्लायओव्हर व सेवा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून प्रगतीपथावर आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : चांदणी चौकातील फ्लायओव्हर व सेवा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय) कडून प्रगती पथावर आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले. जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. या प्रकल्पातील एक भाग म्हणजेच सध्या अस्तित्वातील कोथरूडकडून पाषाणकडे तसेच मुळशीहून कोथरूडकडे जाण्यासाठी असलेला अरुंद पूल (VOP) पाडला जाणार आहे. तो पूल पाडून त्या ठिकाणी नविन पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या संदर्भात अस्तित्वातील पूल पाडण्याचे नियोजन केले जात आहे. पूल पडल्यानंतर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासंदर्भात येथील वाहतुकीचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात सर्व बाजूने येणारी वाहतूक सुरळीत चांदणी चौक ओलांडून कशी जाईल याचे नियोजन सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणन पोलिस, वाहतूक पोलिस, पालिका वाहतूक विभाग यांच्या परवानगी नियोजन अंतिम केले जाईल.दरम्यान, वारजे परिसरातील सोशल मीडियावर चांदणी चौकातील पूल पडल्यावर कशी असेल वाहतूकीचे नियोजन असेल याचा नकाशा व प्रेस नोट पीडीएफ व्हायरल होत आहे. याबाबत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाचे संचालक संजय कदम यांनी सांगितले की, 'असे कोणतेही प्रेस रिलीज व नकाशा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेले नाही. वाहतूक नियोजनांवर पोलीस, वाहतूक पोलीस व अन्य यंत्रणा यांच्या सूचना, परवानगी घेऊन अंतिम केली जाईल. त्यानंतर, ते प्रसिद्ध केले जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT