Bribe
Bribe 
पुणे

वाहतूक पोलिसांचा हस्तक एसीबीच्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्रवासी वाहन करणाऱ्या चालकाकडून दोन हजार 600 रुपये हप्ता घेणाऱ्या हिंजवडी वाहतूक पोलिसांच्या हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने मंगळवारी (ता. 12) वाकड येथील उड्डाणपुलाखाली हिंजवडी वाहतूक शाखेसमोर रंगेहाथ पकडले केली.

भालचंद्र संदीपान कानडे (वय 38, रा. शिंदे वस्ती, मारूंजी) असे आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा वाकड व हिंजवडी परिसरात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्यासाठी महिन्याला एक हजार 300 असे दोन महिन्याचे दोन हजार 600 रुपये हप्ता हिंजवडी वाहतूक विभागातील पोलिसांना देण्याची मागणी कानडे याने त्याच्याकडे केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार विभागाच्या अधिकारी अनिता हिवरकर यांनी सापळा रचून आरोपीला पैसे घेताना रंगेहाथ पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT