पुणे

अभ्यासानंतरच ‘बीआरटी’ धावणार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘वाहतुकीबाबतचे काही तपशील महापालिकेकडून मिळाल्यावर आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ‘बीआरटी’च्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल,’’ अशी माहिती पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी ‘सकाळ’शी बोलताना रविवारी दिली. ‘बीआरटी’च्या अंमलबजावणीला वाहतूक पोलिसांचा विरोध आहे, असे महापालिकेच्या पथ विभागाचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी हा खुलासा केला.

शहरात सातारा रस्त्यावर ‘बीआरटी’चे काम सुरू आहे. तर, नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ अंशतः सुरू आहे. विश्रांतवाडी-संगमवाडी यादरम्यान ‘बीआरटी’ सुरू आहे. हडपसर रस्त्यावरही सध्या ‘बीआरटी’ बंद आहे. पुणे विद्यापीठ ते औंध यादरम्यान ‘बीआरटी’ मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, राजभवनजवळ महापालिकेच्या कामाला पोलिसांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे ‘बीआरटी’चे काम बंद असून, हा प्रकल्प रखडला आहे. शहरातील ‘बीआरटी’ मार्गांसाठी असलेला स्वतंत्र रस्ताही वाहतूक पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला केला आहे. पोलिसांच्या या निर्णयाला स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आहे. तसेच, ‘बीआरटी’बाबत महापालिकेने निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. शहरात ‘बीआरटी’चे १०० किलोमीटरचे ‘बीआरटी’चे जाळे निर्माण करण्याचे कामही सुरू झालेले आहे. मात्र, वाहतूक पोलिस ‘बीआरटी’चे काम अचानक कसे थांबवतात,’’ असा प्रश्‍न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. तसेच, पोलिसांनी सहकार्य केले नाही, तर ‘बीआरटी’चे काम होऊ शकत नाही. ते मिळत नसल्यामुळे सध्या काम बंद पडले आहे,’’ असे महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आयुक्त वेंकटेशम म्हणाले, ‘‘शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्‍यक आहे, हे मान्य आहे. परंतु, ‘बीआरटी’साठीच्या स्वतंत्र मार्गातून बस किती वेळा जाते आणि अन्य वाहने किती जाऊ शकतात, त्यांची क्षमता किती, त्याचा वाहतुकीवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करणे गरजेचा आहे. त्याबाबतची माहिती महापालिकेकडून मागविली आहे. ती मिळाल्यावर ‘बीआरटी’बाबत निर्णय घेतला जाईल.’’

वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांचे हित जोपासले जावेत, अशी शहर पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे. त्यानुसारच विचार करून निर्णय घेतले जातील.
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT