Traffic police officer attacked by army jawan Sakal
पुणे

Pune Crime : सैन्यदलातील जवानाकडून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला

ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केल्यामुळे एकाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केल्यामुळे एकाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी सैन्य दलातील जवानाला अटक केली आहे.

ही घटना बुधवार चौकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी रमेश ढावरे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी पंकज शंकर भोपळे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वैभव संभाजी मनगटे (वय २५, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनगटे हा सैन्यदलात जवान म्हणून नेमणुकीस आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ढावरे चार सप्टेंबर रोजी बुधवार चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी ढावरे यांनी दुचाकीस्वार मनगटे याच्यावर ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. याबाबत शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नोंद केली होती. त्याचा राग मनात धरून मनगटे याने सायंकाळी ढावरे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याने ढावरे यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली.

त्यानंतर तो पळून जात होता. परंतु पोलिसांनी पाठलाग करून मनगटेला शनिवारवाड्याजवळ पकडले. दीड महिन्यापूर्वी कारवाई केल्याचा राग मनात होता. त्यामुळे ढावरे यांना मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या हल्ल्यात ढावरे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT