पुणे

कंटेनर चालक मारहाण प्रकरणी दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन

CD

कंटेनर चालकाला मारहाणप्रकरणी दोन वाहतूक पोलिस निलंबित

पंढरपूर येथील घटना; अधिवेशनात केली होती आमदारांनी मागणी

पंढरपूर, ता. ७ ः कंटेनर चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी आज दिली.
या प्रकरणी आमदार राजू खरे व आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ३ मार्च रोजी शहरातील नो एन्ट्रीतून एक कंटेनर जात असताना पोलिसांनी एक हजार रुपये रोख घेऊन कंटेनर सोडल्याचा आरोप होता. त्यानंतर दोन हजार रुपयांचा ऑनलाईन दंड ही केला. दंडाची पावती संबंधित चालकाच्या मोबाईलवर आल्यानंतर चालकाने परत येऊन सांगोला चौकात कंटेनर रस्त्यावर आडवा लावून पोलिसांना याचा जाब विचारला. यातूनच चालक आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. या दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाला भर चौकात बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यामुळे पंढरपूरच्या पोलिसांची राज्यभरात बदनामी झाली. या घटनेत पोलिसांनी एन्ट्री म्हणून एक हजार रुपये घेतले असा आरोप कंटेनर चालकाने केला होता.
अधिवेशनात मागणी झाल्यानंतर तालिका सभापती समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार विजय कांबळे व रविकांत वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
--
कोट
पंढरपूर शहरात ३ मार्च रोजी पोलिस आणि ट्रक चालकामध्ये वाद झाला होता. त्या घटनेच्या अनुषंगाने अहवाल दिला होता. त्यानुसार दोन वाहतूक पोलिसांवर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. कोणी पोलिस कर्मचारी गैरकृत्य करत असतील तर नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी. - प्रशांत डगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

मुस्लिम तरुणाचे हिंदू मुलीशी ३ वर्ष प्रेमसंबंध; लग्नावेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांची धडक अन्... प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

Latest Marathi News Live Update: बीकेसीमध्ये विस्तारासाठी एनएसईनंतर आता बीएसईची तयारी

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

SCROLL FOR NEXT