Chandrakant Patil
Chandrakant Patil sakal
पुणे

Pune : वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देऊन, पोलिसांऐवजी सीसीटीव्ही मार्फत कारवाई होईल - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

पुणे : " विविध कारणांमुळे शहरातील वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पोलिस ठाण्यांकडील पोलिस, गृहरक्षक दल, खासगी वॉर्डन अशा स्वरुपाचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी सीसीटीव्हीद्वारे ऑनलाईन दंडाची कारवाई होईल.'' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस ते उपस्थित होते. यावेळी माजी महापौर व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार बापू पठारे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ""वाहतुक कोंडी हा प्रश्‍न बैठकीत उपस्थित झाला. त्यानुसार, पोलिसांकडून सध्या वेगवेगळ्या उपाययोजना सुरु आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही महत्वाचे निर्णय घेत वाहतुक कोंडी सोडविण्यावर भर दिला आहे. त्यांना गृहरक्षक दल, खासगी वॉर्डन अशा पद्धतीने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आवश्‍यक निधी देखील त्यांना दिला जाईल. पोलिसांकडून प्रत्येक सिग्नलवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व पोलिस ठाण्यांवर त्यांच्या हद्दीतील वाहतूक सिग्नल नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन दंड आकारणी केली जाणार आहे. होमगार्ड, खासगी वॉर्डन यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.''

शहरात नवीन उड्डाणपुले, भुयारी मार्ग, रस्त्यांची कामे, नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण आणि सीमाभिंतींच्या कामासाठी पन्नास टक्के निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, तर महापालिका चारशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

* एक हजार कोटी रुपयात समाविष्ट 34 गावातील प्रश्‍न मार्गी लागू शकते

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांमध्ये बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसन शुल्क घेतले. त्याचे पाचशे कोटी रुपये निधी "पीएमआरडीए'कडे आहे. मात्र, त्यातून"पीएमआरडीए' ने चौतीस गावांमध्ये कोणतेही विकासकाम सुरू केले नाही. हा विरोधाभास असून, "पीएमआरडीए' ने हा निधी दिल्यास, त्यामध्ये महापालिका व नगरविकास खाते आणखी पाचशे कोटी रुपयांची भर घालून समाविष्ट गावात एक हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली जातील. त्यातून समाविष्ट गावांमधील अनेक नागरी प्रश्न मार्गी लागतील, असेही पाटील यांनी सांगितले

नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी !

राज्यातील पोलिस दलामध्ये लवकरच वीस हजार पोलिसांची केली जाणार आहे. त्यापैकी आठशे पोलिस पुण्यातुन भरती केले जाणार आहेत. याबरोबरच पुणे पोलिस दलात वाघोली, खराडी, बाणेर, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ अशी सात नवीन पोलिस ठाणीही मंजुर झाली आहेत. त्यासाठी आवश्‍यक निधीसाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT