Rasta 
पुणे

ताम्हिणी घाटात एकेरी वाहतूक

मकरंद ढमाले

माले (पुणे) : पुणे-कोलाड रस्त्यावर ताम्हिणी घाटात निवे (ता. मुळशी) गावच्या हददीत काळूबाई मंदिराजवळ रस्त्याला मधोमध भेग पडली. निवे ते डोंगरवाडीदरम्यान ठिकठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे शुक्रवारी (ता. 9) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.

रस्त्यापासून दरीच्या बाजूला रस्ता खचला आहे. दहा-बारा फूट लांब भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला, तर रस्ता सुमारे अर्धा फूट खोल खचला आहे. जोराच्या पावसामुळे रस्ता केव्हाही पूर्णपणे खचून वाहतूक पूर्णपणे बंद होऊ शकते. रस्ता खचल्याने वाहतूक धोक्‍याची झाली आहे. परिसरात जोराचा पाऊस व धुके आहे. रस्ता निसरडा झाला आहे. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने मोठे जड वाहन रस्त्यावरून चुकीच्या बाजूस गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

दोन दिवसांपूर्वी जवळच दरड कोसळली होती. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरजेचे आहे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे, विनायक कोकरे, ताम्हिणीचे उपसरपंच योगेश बामगुडे यांनी केली.

पौड पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी वाहनचालकांना सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. रस्ता खचलेल्या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. वाहनचालकांच्या माहितीसाठी परिसरात धोक्‍याची सूचना देणारे फलक लावणे गरजेचे आहे.

या परिसरात रस्ता खचण्याचा प्रकार चार-पाच वर्षांपूर्वी देखील घडला होता. परंतु त्यावर काही उपाययोजना झाल्या नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्ये रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता आबासाहेब देवकाते म्हणाले, रस्ता खचलेल्या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT