पुणे

रस्त्याकडेच्या ट्रकला धडकून उंडवडीत टेंपो चालकाचा मृत्यू

CD

उंडवडी, ता. १९ : भरधाव मालवाहतूक आयशर टेंपोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकवर जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १९) पहाटे चारच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील टोल नाक्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक आयशर टेंपो (क्र. एमएच ४६ बीयू ८१७४) बारामतीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकवर (क्र. डब्ल्यूबी ३३ केओ ६०३) टेंपो जोरात आदळला. धडक इतकी भीषण होती की आयशर वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून, चालक वाहनात अडकून पडला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने चालकाला वाहनाबाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत चालकाचे नाव समजू शकले नाही. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघातानंतर उंडवडी सुपे येथील उद्धव गवळी व सचिन गवळी यांनी मदतकार्य केले. तसेच, टोल नाका प्रशासनानेही मदतीसाठी पुढाकार घेतला. अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची पाहणी करून पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT