घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून महामार्गावर काम करताना ठेकेदाराने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे होते. राष्ट्रीय महामार्गावर काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने निश्चित केलेल्या नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदाराने सुरक्षेची काळजी घेतली होती का, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रेय भरणे कृषिमंत्री
संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानुरूप सदर दुर्घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, पुढील कामकाजाबाबत योग्य त्या सूचना केल्या आहेत.
- अभिजित औटी, उपमहाप्रबंधक,
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
बिजवडीजवळ महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकारी, सरकारी यंत्रणा व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने बचावकार्यात सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुरूप मदत करण्यात आली असून, या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
- अंकिता पाटील, सभापती, महिला व बालकल्याण समिती, पुणे जिल्हा परिषद
बिजवडी येथील घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली असून, इंदापूर नगर परिषदेच्या माध्यमातून या प्रकरणात आवश्यक तेथे मदतकार्य करण्यात येईल. अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- भरत शहा,
नगराध्यक्ष, इंदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.