पुणे

कडेगाव : कडेपूर येथे तरुण पोलीस शिपायाची आत्महत्या

CD

७५९१
आशुतोष माने

कडेपूरला पोलिसाची
गळफास घेऊन आत्महत्या

कऱ्हाडमध्ये होते कार्यरत; मृत्यूचे कारण अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
कडेगाव, ता. २४ : कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुण पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कडेपूर (ता. कडेगाव) येथे उघडकीस आली. आशुतोष अजित माने (वय २५, रा. टेलिफोन एक्स्चेंज पाठीमागे, कडेपूर, ता. कडेगाव) असे मृत पोलिसाचे नाव आहे. शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांची सहकाऱ्यांमध्ये चांगली ओळख होती.
कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल (ता. २३) पहाटे त्यांनी घराजवळील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कडेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पंचनामा व शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू असून, मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

KGN26B07591

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT