Pune Metro Sakal
पुणे

अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली पुणे मेट्रोची ट्रायल रन

पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोची आज सकाळी ७ वाजता ट्रायल रन पार पडली. पालकमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ट्रायल रन झाली. कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ३ किलोमीटरचा टप्पा तयार आहे. (Trail run of pune metro today conducted dmp82)

पीएमसी क्षेत्रातील वनाज-रामवाडी मार्गिकेतील, वनाज-आयडीयल कॉलनी मार्गावरील पुणेमेट्रोच्या प्रथम 'ट्रायल रन'ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला व पुणे मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.

१० जुलैला वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी झाली होती. "शुक्रवारच्या ट्रायल रनसाठी आम्ही तयार आहोत. यासंबंधीची सविस्तर माहिती नंतर देऊ" असे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने काल सांगितले.

यापूवी पुणे मेट्रोची पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान ६ किमीच्या पट्टयात ट्रायल रन घेण्यात आली होती. उर्वरित पट्टयाचे काम प्रगतीपथावर आहे. शिवाजीनगर ते बुधवार पेठ दरम्यान जमिनीखालून बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. कोरोना काळातील लॉकडाउनचा पुणे मेट्रोच्या कामाला फटका बसला होता. त्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT